Pimpri News : पोलीस आयुक्तालयाकडून 2022 वर्षात आलेले सर्व पासपोर्ट अर्ज वेळेपूर्वी निर्गत

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाने 2022 वर्षात आलेल्या सर्व 65,245 पासपोर्ट अर्ज वेळेपूर्वी निर्गत केले (Pimpri News) आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक रावसाहेब जाधव, प्रमुख, पासपोर्ट कक्ष, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पिंपरी चिंचवड, चाकण आणि तळेगाव दाभाडे सारखी औद्योगिक शहरे, हिंजवडी आय टी पार्क येतं असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक पासपोर्ट साठी अर्ज करत असतात.

Chinchwad By election : लढत कोणामध्ये होणार? राजा वही बनेगा, जो काबील होगा; विरोधकांचा नारा

जाधव म्हणाले की, शासकीय नियमांप्रमाणे 21 दिवसांची मुदतीत पासपोर्ट अर्ज प्रकरण निर्गत करायचे असतात. पण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मध्ये आम्ही जर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता असेल तर 14 दिवसात पासपोर्ट अर्ज प्रकरण (Pimpri News)निर्गत करतो.आयुक्तालय हद्दीतून रकून 24,623 चारित्र्य पडताळणी साठी अर्ज आले होते. त्यापैकी 24,543 अर्ज निर्गत केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.