Pimpri News : ईडीच्या तपासात सहकार्य न करता पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर मूलचंदानींच्या भावांना व पुतण्याला अटक  

एमपीसी न्यूज – सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले, तेव्हा त्यांच्या तपासात अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही, उलट पुरावा नष्ट केला. तपासात अडथळे (Pimpri News ) आणल्याचा ठपका ठेवत ,रात्री पिंपरी पोलिसांनी अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावांना व पुतण्याला अटक केली आहे.

Thergaon News : थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन

अशोक साधुराम मूलचंदानी (वय- 57वर्ष ), मनोहर साधुराम मूलचंदानी (वय- 61वर्ष) सागर मनोहर मूलचंदानी (वय- 26 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच आणखी दोन महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले. तर अमर मूलचंदानी हे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. रात्री उशीरा ईडीने चौकशी पूर्ण केल्यावर ही तक्रार दिली होती.

अमर मूलचंदानी सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. पिंपरी मधील  मिस्ट्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्जांचे वाटप केल्याचेआणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि आज ईडीने छापा टाकला होता. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यावधीचा पैसा अडकून आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.