Pimpri corona news: अगोदर पेशंट गायब झाल्याचा फोन आणि पुन्हा व्हेंटिलेटरवर असल्याचे स्पष्टीकरण 

जम्बो रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; नातेवाईकांना पेशंटची  खात्री करू दिली नसल्याचा आरोप 

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमधून पेशंट बेपत्ता झाल्याचे  रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले गेले. त्यानंतर पेशंट व्हेंटिलेटरवर असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण, पेशंट नेमका  सेंटरमध्ये आहे की नाही याची खात्री रुग्णालय प्रशासनाने करून दिली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला. पेशंट असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते  पण, त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा,  असा सवालही  त्यांनी केला. यातून जम्बो रुग्णालय प्रशासनाचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे.

रावेत येथे राहणाऱ्या भाग्यश्री भावे यांची आई लक्ष्मी हरी गाडगीळ यांना 14 एप्रिला जम्बोत ऍडमिट केले. तेव्हा त्यांना जी 46 हा वॉर्ड देण्यात आला. दोन चौकशी नंबर देण्यात आले. त्यावर तीन दिवसांपासून माहिती विचारत आहोत. रुग्णाची प्रकृती स्थिर  असल्याचे सांगितले. पण, काल सकाळपासून त्यांचा फोन लागला नाही.

आज अचानक एक वाजता फोन आला आणि आई बेडवर नसल्याचे सांगितले गेले.  परत, डिस्चार्ज मिळाल्याचा दुसरा फोन आला. हे कसे शक्य आहे. मला माहिती नाही. तुम्ही कोणाला डिस्चार्ज दिला, अशी विचारणा केली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर पाच ते सहा तास थांबलो. सहाच्या सुमारास प्रीती मॅडम यांना माहिती दिली. त्यानंतर आमचा पेशंट येथेच असून व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले. दोन लक्ष्मी नावाचे  पेशंट असल्याचेही  सांगितले. आम्हाला व्हिडीओ कॉल करू दिला नाही. पीपीई किट घालून आतमध्ये जातो म्हटले तरी जावू दिले नाही. सगळा सावळा गोंधळ आहे. आमचा पेशंट जिवंत  आहे की नाही हे कळत नाही. पेशंटला दाखविले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

‘जम्बो’चे नियंत्रित अधिकारी बाळासाहेब खांडेकर म्हणाले, एकच नावाचे दोन  रुग्ण असल्याने गोंधळ झाला. लक्ष्मी गाडगीळ या   जम्बोत आहेत. तसेच त्यांची प्रकृती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.