_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri News : कोरोना सद्यस्थिती व संभाव्य परिस्थितीचा आढावा घेणारा ऑनलाईन वेबिनार मंगळवारी

एमपीसी न्यूज – कोरोना सद्यस्थिती व संभाव्य परिस्थितीचा आढावा घेणारा वेबिनार उद्या (मंगळवारी, दि.18) आयोजित करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाची पहिली, दुसरी व संभाव्य तिसऱ्या लाटेची तज्ञ डाॅक्टर यावेळी माहिती देणार आहेत. ‘चला करूया पिंपरी चिंचवड शहर कोरोनामुक्त’ अभियानांतर्गत विविध सामाजिक संस्थांनी या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले आहे.

पिंपरी चिंचवड सिटिझन फोरम (PCCF), आरोग्य मित्र फाऊंडेशन, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, पोलीस नागरीक मित्र संघटना व इतर इतर सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

वेबिनारमध्ये ‘या’ तज्ञ डाॅक्टरांचा असेल सहभाग

– डाॅ. अनिरुद्ध टोणगावकर
एम.डी मेडीसिन (फिजिशियन)
संचालक : स्टर्लिंग हाॅस्पिटल
प्रोप्रायटर : टोणगावकर हाॅस्पिटल, आकुर्डी

– डाॅ. सुशील मुथियान
डिओएमएस, डिएनबी (नेत्र सर्जन)
संचालक – अमेया नेत्रालय, निगडी

_MPC_DIR_MPU_II

– डाॅ. विकास मंडलेचा
एमडी पॅथोलॉजी
प्रोप्रायटर : श्रध्दा लॅब निगडी
संचालक स्टर्लिंग हाॅस्पिटल, प्राधिकरण

याशिवाय ज्या डॉक्टरांनी शहरात कोरोना काळात जवळून कामकाज पाहिले आहे असे वैद्यकीय तज्ञही यामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये डाॅ. तानाजी बांगर हे बीएएमएस, पीजी डिप्लोमा मेडिकल रिसर्च असून त्यांना वीस वर्षांचा वायसीएम, निरामय व रुबी हॉस्पिटल मधील प्रदिर्घ अनुभव आहे.ज्ञतसेच, बीडीएस चाचणी व लसीकरण समन्वयक डॉ. वैभव एम कर्णे सहभागी होणार आहेत.

मिटींग युआरएल https://us02web.zoom.us/j/83842118167?pwd=N3hYdDI3ZEszcm1XajJIYzZLaXdjUT09

मिटींग ID : 838 4211 8167, पासकोड : 822724

वार – मंगळवार, 18 मे 2021
वेळ : 4:30 वा

कोरोना संसर्गाच्या सद्यस्थिती व संभाव्य परिस्थितीचा आढावा या वेबिनारमध्ये घेतला जाणार असून, तज्ञ डाॅक्टर आपली मतं मांडणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांनी केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.