Pimpri News : कष्टकरी जनता महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिता सावळे

0

एमपीसी न्यूज – कष्टकरी जनता महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिता सावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, जिल्हाध्यक्ष मल्हार काळे, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळवे, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष जयश्री एडके, मधुरा डांगे, अनिता काजळे आदी यावेळी उपस्थित होते,

कष्टकरी जनता महिला आघाडीच्या वतीने देशातील 40 कोटी असंघटित कामगार व कष्टकरी यांच्यासाठी कायदा व्हावा यासाठी लढा देणार असल्याचे सावळे यांनी नियुक्तीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment