Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहराचे जुने दुर्मिळ फोटो पाठविण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाली असून शहराच्या जडणघडणीवर ‘खेडेगाव ते स्मार्टसिटी’ असा ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. त्यासाठी शहराच्या जडण घडणीचे जुने दुर्मिळ फोटो पाठवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या भूमीत 1950 च्या दशकात आलेला पहिला केंद्र सरकारचा एच.ए. कारखाना नंतर पुढे आलेल्या टेल्को (टाटा मोटर्स) बजाज या कंपन्या कालांतराने उदयास आलेली एमआयडीसी , 4 मार्च 1970 ला शहर म्हणून या भूमीला मिळालेली ओळख, पुढे अस्तित्वात आलेली महानगरपालिका, बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी ते आता जगातील वेगवान शहर असा चकीत करणारा प्रवास असलेल्या या शहराचा संपूर्ण इतिहास आता ग्रंथरुपात आकारास येत आहे.

त्यानिमित्ताने शहरातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, संघटना, विविध राजकीय पक्ष, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, औद्योगिक कारखानदार, कामगार संघटना यांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्याकडे असलेले दूर्मिळ फोटो, माहिती, वृत्तपत्र कात्रणे असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क – अंशुल प्रकाशन, संचालक – विजय जगताप, भ्रमणध्वनी – 9822042515, ईमेल – [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.