Pimpri News: मोफत पाससाठी दिव्यांगांना अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडून पीएमपीएमएलच्या मोफत बसपाससाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज वाटप व स्वीकृतीची मुदत 31 जुलैपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत राहणार आहे. अर्जवाटप पिंपरीतील लोखंडे कामगार भवनात सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महापालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएलचा मोफत बसपास देण्यात येतो. त्याअनुषंगाने सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता दिव्यांग व्यक्तींकडून मोफत पाससाठी अर्ज मागविले आहेत. अर्जवाटप व स्वीकृतीची मुदत 31 जुलैपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत राहणार आहे. अर्जवाटप पिंपरीतील कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवनात सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत होईल.

नवीन पास आणि नूतनीकरणासाठी मी-कार्ड आणि ओळख पडताळणीसाठी दिव्यांग व्यक्तींनी आधारकार्डची झेरॉक्स प्रत, एक फोटो, रेशनकार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन यावे. कोरोनामुळे दिव्यांगांनी सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे, तसेच दिव्यांग व्यक्तींनी दिलेल्या मुदतीतच अर्ज दाखल करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.