Pimpri news: मुद्रांक शुल्काची सवलत एमआयडीसी, प्राधिकरण, सिडको, हडको संस्थाना सुध्दा लागू करा – मंगला कदम

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन पाठविले आहे.

एमपीसी न्यूज – राज्यभरामध्ये कोरोना संसर्गामुळे अडचणीत सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्क दर निम्म्यावर आणण्याचा स्वागताहार्य निर्णय घेतला आहे. यामध्ये एमआयडीसी, प्राधिकरण, सिडको, हडको इत्यादी संस्थामधील घरे घेतल्यास सवलत मिळत नाही. त्यामुळे या भागातील घरे घेणा-या नागरीकांना या सवलतीचा फायदा होणार नाही. त्यासाठी या संस्थाना सुध्दा ही योजना लागू करण्याची मागणी माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन पाठविले आहे.

त्यात नगरसेवक कदम यांनी म्हटले आहे की, राज्यभरामध्ये कोरोना संसर्गामुळे अडचणीत सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्क दर निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

सदरचा निर्णय स्वागताहार्य आहे. घरांच्या खरेदीसाठी हा निर्णय प्रोत्सहान देणारा ठरणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे त्याचबरोबर घरे खरेदी करणा-या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

परंतु सदरच्या शासन निर्यणात एक त्रुटी आहे. हा निर्णय महापालिका हद्दीत तसेच ग्रामीण भागासाठी आहे. यामध्ये एमआयडीसी, प्राधिकरण, सिडको, हडको इत्यादी संस्थामधील घरे घेतल्यास सवलत मिळत नाही. त्यामुळे या भागातील घरे घेणा-या नागरीकांना या सवलतीचा फायदा होणार नाही.

तसेच एमआयडीसी, प्राधिकरण, सिडको,हडको या संस्था सरकारी असून तसेच या संस्थामार्फत घरे घेणा-या ग्राहकांचे प्रमाण लक्षणीय आहे.

त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच होणार आहे. त्यामुळे हा शासन निर्णय या संस्थांना लागू केल्यास सर्वच ग्राहकांना याचा फायदा होईल.

मुद्रांक शुल्कामध्ये सवलतीचा लाभ सर्वच ग्राहकांना मिळण्यासाठी एमआयडीसी, प्राधिकरण, सिडको, हडको इत्यादी संस्था मार्फत घरे घेणा-या ग्राहकांनाही या शासन निर्णयाचा लाभ देण्यात यावा अशी विनंती कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.