Pimpri News: अर्थसंकल्पाला 250 कोटी रुपयांच्या उपसूचनांसह ‘स्थायी’ची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षांच्या प्रशासनाच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने 250 कोटी रुपयांच्या उपसूचना देत मंजुरी दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

अर्थसंकल्पाची तहकूब सभा आज (बुधवारी) पार पडली. संतोष लोंढे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. कोणतीही करवाढ, दरवाढ, पाणीपट्टी वाढ नसलेला महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी 1 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी (दि.18) स्थायी समितीला सादर केला होता. त्यावर स्थायी समितीने सात दिवस अभ्यास केला.

आज झालेल्या सभेत स्थायी समितीने तब्बल 250 कोटी रुपयांच्या 19 उपसूचना दिल्या आहेत. त्यामध्ये महापौर निधीत वाढ, स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रभागात ‘लेझर शो’ अशा कामांचा समावेश करण्यात आला आहे.

वाढ घट करत आयुक्तांच्याच अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी देत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.