Pimpri News : शेतकरी व भूमिहीन मजूरांना तीन हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचे विधेयक मंजूर करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र विधानपरिषदेत मार्च 2017 रोजी स्थापित करण्यात आलेले 55 वर्षाच्या पुढील शेतकरी, कारागीर व भूमिहीन मजूरांना दरमहा तीन हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचे विधेयक त्वरीत मंजूर करावे, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

गजानन बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत निवेदन केले आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे, महाराष्ट्रातील 55 टक्के नागरिक खेड्यात राहतात. खेड्यातील सध्याची अर्थिक परिस्थीती अतिशय बिकट आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतिशय हाल होत आहेत. शेतक-यांना वार्धक्याच्या काळात आर्थिक सहाय्य देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेत मार्च 2017 रोजी स्थापित करण्यात आलेले 55 वर्षाच्या पुढील शेतकरी, कारागीर व भूमिहीन मजूरांना दरमहा तीन हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचे विधेयक त्वरीत मंजूर करावे, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.