Pimpri News : ‘मेट्रो प्रकल्प निगडीपर्यंत मंजूर करा; अन्यथा प्रकल्पाचे उद्घाटन होऊ देणार नाही’

मनसे शहराध्यक्ष तथा महापालिका गटनेते सचिन चिखले यांचा इशारा

एमपीसी न्यूज: पिंपरी-चिंचवड शहरवासियांच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्प निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत होणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आला असून त्यावर अजून कोणतीही अमंलबजावणी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे या प्रकल्पाला निगडीपर्यंत मंजुरी दयावी, अन्यथा या प्रकल्पाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र निर्माण सेनेचे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी दिला आहे.

महानगरपालिकेने पुढाकर घेऊन पिंपरी ते निगडी या मेट्रो प्रकल्प अहवालाला मार्च 2019 रोजी मान्यता दिली. हा अहवाल राज्यशासनाने मंजूर केलेला आहे. परंतु, केंद्राकडून यांवर काहीच अंमलबजावणी न झाल्यामुळे निगडीवासियांच्या मनात नैराश्येचे वातावरण आहे.

पिंपरी ते दापोडी अहवाल केंद्रशासनाकडे पाठवला गेला आहे. निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प व्हावा यासाठी विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने केली आहेत.

दरम्यान, मनसेने या निवेदनाच्या प्रती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आदींना पाठविल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.