Pimpri news: कोरोनाच्या औषध व इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांना अटक करा- राजू मिसाळ

एमपीसी न्यूज – पालिकेच्या काही रुग्णांलयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारी औषधे तसेच इंजेक्शन हे बाहेरुन आणावे लागत असल्याबाबतच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये शहरातील सर्व सामान्य अगोदरच धास्तावलेला आहे. अशावेळी त्यांच्याकडून महागडी औषधे व इंजेक्शन बाहेर मागल्यास त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक योग्य नाही. कोरोनाच्या औषध व इंजेक्शनचा काळा बाजार करणा-यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.

मिसाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गावर नियत्रंण आणण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे. शहरातील सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत.

त्याच प्रमाणे राज्य शासनाकडूनही आवश्यक ती मदत मिळत आहे तसेच जंम्बो हास्पिटल नेहरुनगर व अँटो क्लस्टर येथे उभारण्यात आले आहे. शहरातील सरकारी व खाजगी वैद्यकीय यंत्रणा यासाठी काम करीत आहे.

परंतू, पालिकेच्या काही रुग्णांलयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारी औषधे तसेच इंजेक्शन हे बाहेरुन आणावे लागत असल्याबाबतच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये शहरातील सर्व सामान्य अगोदरच धास्तावलेला आहे. अशावेळी त्यांच्याकडून महागडी औषधे व इंजेक्शन बाहेर मागल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक योग्य नाही.

मनपाच्या कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांस बाहेरून औषधे किंवा इंजेक्शन आणण्यास सांगितल्यास त्याबाबत माझ्या कार्यालयात, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पार्टी कार्यालयात किंवा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कुठल्याही नगरसदस्याकडे व शहरातील कोणत्याही राष्ट्रवादी पदाधिका-यांकडे लेखी स्वरुपात तक्रारी देण्यात याव्यात. म्हणजे त्यांची योग्य दखल घेण्यात येऊन औषधांचा व इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या कोणत्याही दर्जांच्या हॉस्पिटल, मेडीकल व डॉक्टर यांची गय केली जाणार नाही.

शहरामध्ये अनेक लोक कोरोना योध्दे म्हणून काम व कर्तव्य करीत असून त्यांना आमचा मनापासून धन्यवाद. परंतु काही काळाबाजार करणा-या व्यक्तींमुळे या योद्धयांची सुध्दा बदनामी होते. ती सुध्दा खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.