Pimpri Crime News : अल्पवयीन मुलीशी व आईशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – महिलेशी ओळखीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले, पुढे तिच्याच 17 वर्षीय मुलीशी गैरवर्तन करत मुलीशी (Pimpri Crime News) लग्न लावून देण्यासाठी दबाव आणणाऱ्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरु होता.

याप्रकरणी 40 वर्षीय पीडितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सद्दाम उर्फ उजाला जमसेद (वय 35 रा.पिंपरी गाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Pune News : 21 व्या पिफ अंतर्गत सहा दिवस व्याख्यानमालेचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.य याबाबत कोणाला सांगितले तर पीडितेच्या मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच पीडतेच्या 17 वर्षीय मुलीशी गैरवर्तन करत तिच्याशी लग्न लावून दे असा दबाव आणला, लग्न नाही लावले तर पीडितेचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.तसेच कॉल रेकॉर्डींग व्हायरल केली. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास (Pimpri Crime News) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.