Pimpri News : जाब विचारला म्हणून मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – पत्नीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला आठ जणांनी बेदम (Pimpri News) मारहाण केली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री खराळवाडी पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.उमेर समीर तांबोळी (वय 18, रा. खराळवाडी पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह साद समीर तांबोळी आणि अन्य पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : पुणे पोलिसांनी 65 जणांवर लावाला मोक्का तर 42 गुन्हेगारांना केले तडीपार

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या आईसोबत बोलत थांबल्या असताना आरोपी उमेर याने त्यांच्याकडे पाहून अश्लील हातवारे केले. हा प्रकार त्यांनी पतीला सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांचे पती घडलेल्या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी (Pimpri News) यांच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी उमेर हा फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.