Pimpri News : मिनी ट्रक बंद पडल्याने पिंपरी पुलावर वाहतूक खोळंबली, वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्पच्या दिशेने जाणारा मिनी ट्रक रस्त्यावर बंद पडल्याने आज, सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पिंपरी पुलावर वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून वाहन चालकांना गाडी चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

मागील अर्धा तासांपासून पिंपरी पुलावर वाहनांची गर्दी होत आहे. केवळ एक वाहतूक पोलीस आणि दोन वाॅर्डन बॉय वाहनांना रस्ता मोकळा करण्यासाठी काम करत आहेत. पिंपरी पुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.

सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी जाणा-या लोकांची संख्या अधिक असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या वाढते.

अशात मिनी ट्रक बंद पडल्याने पिंपरी पुलावर वाहतूक खोळंबली असून. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पिंपरी पुलावर उभ्या असलेल्या रिक्षा देखील वाहतूकीसाठी अडथळा ठरत आहेत.

दरम्यान, मिनी ट्रक बाहेर काढण्यासाठी व ट्रॅफिक कमी करण्यासाठी एक वाहतूक पोलीस व दोन वाॅर्डन बॉय पिंपरी पुलावर कार्यरत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.