Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहर मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी ॲड. लक्ष्मण रानवडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा ) मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी शिवशाहू फुले, आंबेडकरी विचाराचे अभ्यासक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे यांची आज नियुक्ती करण्यात आली.

अल्प बचत भवन, पुणे येथे मराठा सेवा संघाच्या निवड समितीच्या आज झालेल्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे व कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांच्या हस्ते ॲड. रानवडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी इंजि. विजयकुमार ठुबे, प्रकाश जाधव, संतोष शिंदे व विविध कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वाल्मिक माने यांना शहराच्या कार्याध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले.

ॲड. लक्ष्मण रानवडे हे पिंपरी-चिंचवड शहर मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. ॲड. रानवडे हे ज्येष्ठ कार्यकर्ते असून गोरगरिब दिनदुबळे, दलित, अपंग, अनाथ यांच्या सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान’ पुरस्कार 2017 साली देऊन गौरविले आहे. ते श्री. जगद्गुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून प्रियदर्शनी मोफत कायदा सल्ला केंद्र गोरगरिबांसाठी चालवित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.