Pimpri News: महापालिका आयुक्तांच्या फोटोचा वापर करुन ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवकांकडे आर्थिक मदतीची विचारणा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या   फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर करुन ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवक तसेच नागरिकांना फसविण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग करुन आर्थिक मदतीची विचारणा केली आहे.  

महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी पोलीस खात्याशी संबंधित सायबर सेलकडे फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर याबाबत तक्रार नोंदविली आहे.  या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्र. 7524891151(७५२४८९११५१) या नंबरवरुन व्हॉटस्अपच्या माध्यमातून नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग करुन आर्थिक मदतीची विचारणा केली आहे.  तसेच मोबाईल क्र. 7977510080 (७९७७५१००८०) या क्रमांकावरुनही व्हॉटस्अपच्या माध्यमातून अशाच प्रकारे आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे.

 

सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि शहरवासियांना कळविण्यात येते की अशा प्रकारे होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी मोबाईल क्र. 7524891151 (७५२४८९११५१) आणि  मोबाईल क्र. 7977510080 (७९७७५१००८०) या क्रमांकावरुन अथवा अन्य क्रमांकावरुन फेक प्रोफाईल आयडीद्वारे कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास त्याबाबत पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये.  अशा प्रकारे कोणतीही मागणी करण्यात येत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.