Pimpri News : हाथरस मधील घटनेचा बहुजन सम्राट सेना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपने केला निषेध

एमपीसी न्यूज – हाथरस येथील घटनेचा बहुजन सम्राट सेना आणि डॉ, बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने वतीने निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत असून बहुजन सम्राट सेनेच्या वतीने ही जिल्हाधिकार्‍याना निवेदन देऊन घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज (गुरुवारी) आंदोलन करण्यात आले. हातात निषेधाचे फलक घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. पीडित मुलीच्या कुटुंबांना संरक्षण देण्यात यावे. शासकीय मदत देण्यात यावी, घटनेतील आरोपींना कडक शासन व्हावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप झाला.

हाथरस येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी असून उत्तर प्रदेश सरकार व केंद्रातील सरकार या प्रकरणातील आरोपींना वाचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पीडित कुटंबाला धमक्या देण्यात येत असून या घटनेतील सत्य लपवण्यासाठी सरकार अतिशय खालच्या स्तरापर्यंत जात आहे. त्यामुळे या कुटुंबाला व पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, डॉ, बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम, क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे, रोजगार निर्माण परिषदेचे बाबूराव मदने, भिमशाही युवा संघटना अध्यक्ष शिवशंकर ऊबाळे, सामाजिक कार्येकर्ते बाळासाहेब बरगले, हौसराव शिंदे,अशोक डोंगरे, मनोज खलसे, मनोज रिकीबे, सतीष जावळे , बबन जावळे, नसीर शेख, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.