Pimpri News : शहरात घरोघरी नमाज पठण करून ‘बकरी ईद‘ साधेपणाने साजरी

एमपीसी न्यूज – मुस्लिम बांधवाचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमजान ईद व बकरी ईद रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईद साजरी करण्यात येते. यंदाही बकरी ईद सणावर कोरोनाचे सावट असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी त्याग, बलिदानाची बकरी ईद घरोघरी नमाज पठण करून साधेपणाने साजरी केली.

अनेक मुस्लिम बांधवांना ईदची नमाज व्यवस्थित पढता यावी, यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेवून आज सकाळी आठ वाजता ऑनलाईन ईदची नमाज पढवण्यात आली. मुस्लिम समाजातील ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. त्यांनी बकर्‍याची ‘कुर्बानी‘ द्यावी अशी प्रथा आहे. बकरी ईद निमित्त आपल्या आजूबाजूला राहणारे गरीब, वंचित समाज बांधवांना शोधून त्याच्या घरात ईदचा आनंद कसा निर्माण होईल, यासाठी युवकांनी पुढाकार घेत ईदला लागणारे खाद्यपदार्थ देण्यात आले, असे चित्र शहरातील विविध भागात दिसून आले.

शहरातील मशीद, मदरसामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे मोजक्याच लोकांनी ईदची नमाज धर्मगुरुंकडून पढविण्यात आली. अनेक मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा विविध धर्मातील परिचिता करवी. व्हाट्सअ‍ॅप व मेसेजद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मुस्लिम बांधवांनी आपल्या नातेवाईकांना मोबाईलद्वारे संभाषण एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिंचवडगाव, नेहरुनगर, देहूरोड आदी भागातील ईदगाह मैदानावर होणारी सार्वजनिक नमाज पठण यंदाच्या ईदला ही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आली नाही. चिंचवडगाव, नेहरूनगर, पिंपरी लिंकरोड आदी ठिकाणी कब्रस्तान आहे. तेथे मुस्लिम बांधवांनी आपल्या कुटूंबातील दिवंगत पूर्वजांच्या कबरीवर पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.