Pimpri News: बाळशास्त्री जांभेकर यांची भूमिका आजही समाजाला मार्गदर्शक ठरतेय – ढाके

एमपीसी न्यूज – आपल्या मतांचा आणि विचारांचा प्रचार, प्रसार करण्याचे साधन म्हणून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून बजावलेली भूमिका आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे, असे मत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस ढाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे , आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्या अनुराधा गोरखे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

ढाके म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1812 रोजी दर्पण वृत्तपत्राची सुरुवात करुन नवा आयाम निर्माण केला. पत्रकारीतेचा वारसा निर्भिडपणे चालविणाऱ्या सर्व माध्यम प्रतिनिधींना जांभेकरांच्या माध्यमातून प्रेरणा मिळत राहील असे सांगून पत्रकारांनी समाजाच्या उन्नतीसाठी दीपस्तंभासारखे काम करावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'8757e0151e9661bf',t:'MTcxMzMwOTMwNy4xNzcwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();