Pimpri News: बँक, फार्मास्युटीकल, विक्रीकर, एलआयसी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर प्रमाणपत्र मिळणार नाही

एमपीसी न्यूज – शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 1 मेपासून वय वर्षे 18 ते 44 मधील व्यक्तींची लसीकरण कार्यवाही सुरु करण्यात आल्याने यापुढे बँक कर्मचारी, फार्मास्युटीकल, विक्रीकर कार्यालय, एलआयसी आदी कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचा-यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय यांच्यामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालये, सर्व दवाखाने आणि रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत.

यापूर्वी बँक कर्मचारी, फार्मास्युटीकल, विक्रीकर कार्यालय, एलआयसी आदी कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचा-यांना त्यांचे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची शहानिशा करुन त्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्रमाणित करण्यात येत होते.

या प्रमाणित करुन देण्यात आलेल्या अधिकारी- कर्मचा-यांना महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याबाबत मान्यता देण्यात आली होती.

दरम्यान, शासनाने 1 मे पासून वय वर्षे 18 ते 44 मधील व्यक्तींच्या लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.