_MPC_DIR_MPU_III

Ganeshutsav 2020: बाप्पाचे उत्साहात स्वागत; कोरोनाचे सावट असले तरी उत्साह कमी नाही

दरवर्षी प्रमाणे वाजत-गाजत गणरायाला घरी नेण्याचे अनेकांनी टाळले. साध्या पद्धतीने गणरायाची मूर्ती घरी आणली.

एमपीसी न्यूज – ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाचे आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात घरोघरी, सार्वजनिक मंडळांनी स्वागत केले. बाप्पाच्या स्वागताला वरूणराजाने हजेरी लावली होती. दरवर्षी प्रमाणे वाजत-गाजत गणरायाला घरी नेण्याचे अनेकांनी टाळले. साध्या पद्धतीने गणरायाची मूर्ती घरी आणली. कोरोनाचे सावट असले तरी उत्साह कुठेही कमी नव्हता.

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 41 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आणि बंधने आली आहेत.

दरवर्षी गणरायाचे वाजत-गाजत धुमधडाक्यात स्वागत केले जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली शहरातील घरोघरी, सार्वजनिक मंडळांनी सुरक्षित अंतराचे पालन करत त्याच उत्साहात बाप्पाचे स्वागत केले.

_MPC_DIR_MPU_II

प्रशासनाने देखील गणेश मंडळांवर विविध बंधने घातली आहेत. नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, गणरायासाठी आवश्यक पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, मखर, विद्युतमाळा आदी खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे कोरोनाचे संकट असूनही बाजारांमध्ये गर्दी दिसून आली.

पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दूर्वा, तुळशी, पत्री आदी साहित्य अनेकांनी खरेदी केले. प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही भाविकांनी मिठाईच्या दुकानाबाहेर गर्दी केली होती.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.