Pimpri News : पवना बँकेच्या निवडणुकीतून भाऊसाहेब भोईर यांची माघार

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर

एमपीसी न्यूज – पवना सहकारी बँकेच्या पंचवार्षिक (Pimpri News) निवडणुकीतून शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी आज (सोमवारी) माघार घेतली आहे. बँकेच्या प्रगतीसाठी माघार घेत भोईर यांनी  माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे. भोईर यांच्यासह भाऊसाहेब वाघेरे, विमल दंडवते यांनीही माघार घेतली आहे.  सहकार पॅनलला पाठिंबा दिला.

 

Punawale News : बिल्डरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईस टाळाटाळ का?

 

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुनी बँक असलेल्या पवना सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक 9 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी 46 जणांनी अर्ज दाखल केले होते. पूर्वी 8 उमेदवारांनी माघार घेतली आहे. अर्ज माघार घेण्यासाठी उद्यापर्यंत मुदत आहे. त्याच्या एकदिवस अगोदर भाऊसाहेब भोईर यांनी माघार घेतली आहे.

 

माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांच्यासह सर्वांच्या विनंतीला मान देत माघार घेतली. अण्णासाहेब मगर सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे. भोईर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेताना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे, माजी नगरसेवक नाना लोंढे, शत्रुघ्न काटे उपस्थित होते. भोईर यांनी माघार घेतल्याने (Pimpri News) बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिसून येते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.