Pimpri News: भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघीतील रुग्णवाढ कायम; सर्वाधिक 2483 सक्रिय रुग्ण

Pimpri News: Bhosari, Gavalinagar, Charholi, Dighi patient growth continues; Most 2483 active patients 5 हजार 60 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, शहरातील 662 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असून पालिकेच्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी परिसर येत असलेल्या ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील रुग्णवाढीचा आलेख कायम आहे. प्रभागात सर्वाधिक 2483, त्याखालोखाल ‘फ’ प्रभागाच्या हद्दीत 1410 सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रभाग कोरोना हॉटस्पॉट झाले आहेत. तर, सर्वांत कमी म्हणजेच 587 रुग्ण ‘क’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

महापालिकेने सोमवारी (दि.17) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. शहरातील 9216 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.

तेव्हापासून शहरातील 36 हजार 78 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 25 हजार 60 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, शहरातील 662 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. सोमवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी परिसर येत असलेल्या ‘इ’ प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक 2483 तर त्याखालोखाल चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 ‘फ’ कार्यालयाच्या हद्दीत 1410 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 1169 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 1328 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 587 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे सर्वांत कमी म्हणजेच 703 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे सर्वाधिक 2483 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 1410 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 925 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे सर्वांत कमी म्हणजेच 611 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.