Pimpri News : रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते भूमिपूजन  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने  प्रभाग क्रमांक 21 पिंपरी येथील  HB ब्लॉक मधील सुरु करण्यात येणार्‍या सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज पार पडले.

याबाबतीत अधिक माहिती देताना नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, महापलिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर अवघ्या तीन वर्षात पिंपरी गाव व परिसराचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्य व अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण, क्रीडांगणे, व्यायामशाळा, स्मशानभूमी, रेल्वे उड्डाणपुल, पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर नदी वरील समांतर पूल इत्यादी विकासकामे मार्गी लागली आहेत. सदरची विकासकामे मार्गी लागत असताना नागरिकांना होणार्‍या त्रासाबद्दल वाघेरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच नागरिकांनी विकासकामांसाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक संदीप वाघेरे, हिरानंद आसवाणी, निकीता कदम, उपअभियंता विनय ओव्हाळ,कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, सुरक्षा आधिकारी विलास वाबळे आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघेरे, जयेश चौधरी, प्रविण कुदळे, चंद्रशेखर आहेरराव, गणेश ढाकने, रविंद्र कदम आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.