Pimpri News: स्वच्छ सर्वेक्षणात शहराची मोठी सुधारणा, सफाई कर्मचाऱ्यांचे अभिनंदन – एकनाथ पवार

पिंपरी-चिंचवड देशात पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ पवार यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची स्वच्छ सर्वेक्षणात मोठी सुधारणा झाली आहे. शहराचा देशात 24 वा तर राज्यात 7 वा क्रमांक आला आहे. पालिकेच्या सफाई कर्मचा-यांमुळेच हे शक्य झाले. त्या सर्वांचे अभिनंदन करतो. पुढील वर्षी यामध्ये नक्कीच आणखी सुधारणा होईल. पिंपरी-चिंचवड देशात पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ पवार यांनी सांगितले. तसेच सत्ताधारी म्हणून सफाई कर्मचा-यांना कशाचाही कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडीवर जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची यंदा सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 24 वा क्रमांक मिळाला आहे. तर, राज्यात पिंपरी शहर पहिल्या दहामध्ये आले असून 7 वा क्रमांक आला आहे.

पालिकेचे सफाई कर्मचारी, आरोग्य अधिकारी, आयुक्तांचे अभिनंदन करत माजी सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराची घसरण झाली होती.

यंदा त्यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे. स्वच्छता कर्मचारी, महापालिका अधिका-यांनी चांगले काम केले आहे.

शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्थांनी देखील यासाठी योगदान दिले आहे. यामुळेच शहराचा देशात 24 वा क्रमांक आला.

तर, राज्यात पिंपरी-चिंचवड शहर पहिल्या दहामध्ये येत 7 वा क्रमांक मिळाला आहे. हे गौरवास्पद असून स्वच्छता कर्मचा-यांचे मनापासून अभिनंदन करतो. कोरोनाच्या महामारीतही सफाई कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.

पुढील वर्षात आणखी सुधारणा केल्या जातील. शहर पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी सफाई कर्मचा-यांनी सत्ताधारी म्हणून कशाचीही कमतरता भासू देणार नाही.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याला आमचे प्राधान्य आहे. पुढीलवर्षी शहरवासीयांच्या सहकार्याने नक्कीच सर्वेक्षणात शहराचा नंबर आणखी उंचावलेला असेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.