Pimpri News : पिंपरी चिंचवड महापालिकेत सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे , ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी आदी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आज (रविवारी, दि. 23) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर माई ढोरे यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.

प्रखर देशाभिमान आणि उत्तम संघटन कौशल्य असलेले स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रभावी नेतृत्व तरुण पिढीमध्ये संघटनात्मक बांधिलकी रुजावी यासाठी महत्वपूर्ण ठरत असून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.