Pimpri News: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बदनामी करणा-यांवर कारवाई करण्याची शहर भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी व विडंबन करणारी छायाचित्र ‘आयुब जमादार’ याने वैयक्तिक फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केली आहेत. यामुळे पाटील यांची सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा जाणूनबूजून प्रयत्न होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे बदनामी करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी शहर भाजपने पोलिसांकडे केली आहे.

याबाबत भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस स्वीकृत नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे यांनी आज निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जदारवाड यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी व विडंबन करणारी छायाचित्र ‘आयुब जमादार’ याने वैयक्तिक फेसबुक अकाऊंट वरून पोस्ट केली आहेत. तसेच तेच छायाचित्र ‘किर्तीसिंह कोरेकर पाटील’ याने ‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.

या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पाटील यांची सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा जाणूनबूजून प्रयत्न होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या अशा पोस्टमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. या अशा पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.