Pimpri News : भाजयुमोतर्फे गरजु महिला व मुलींना ‘सॅनिटरी नॅपकीन’ वाटप

एमपीसी न्यूज- भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभागातर्फे 200 गरजु महिला व मुलींना सहा महिन्यांचे सॅनिटरी नॅपकीन करण्यात आले. रविवारी (दि. 25) हा कार्यक्रम‌ पार‌ पडला.

पिंपरी चिंचवड शहराच्या युवती विभागाच्या सोशल मीडिया संयोजिका पुजा आल्हाट, युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती प्रदेश सह संयोजिका वैशाली खाड्ये, अलका वाघुले, विजया आल्हाट, सुजाता बोराटे, सुरेखा बनकर, सिंधू आल्हाट या उपस्थित होत्या.

भारतीय जनता युवा मोर्चातील युवतींनी दुर्गा महोत्सवाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या सक्षम नसनाऱ्या 200 महिलांना सहा महिने पुरेल एवढे सॅनिटरी नॅपकीन देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.