Pimpri News : भाजपने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने आणि महावितरणने सर्वसामान्य नागरिकांना वाढीव वीज बीले पाठवून वीज पुरवठा खंडित करण्याचे कुटील कारस्थान केल्याचा आरोप करत शहर भाजपने आज (शुक्रवारी) आंदोलन केले. पिंपरीतील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

पिंपरीतील महावितरण कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात महापौर उषा ढोरे, माजी खासदार अमर साबळे, महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, सदाशिव खाडे, पालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके, नगरसेवक संदीप वाघेरे, उत्तम केंदळे, शीतल शिंदे, मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, शैलेश मोरे, महिला शहराध्यक्षा उज्वला गावडे, नगसेविका अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, शर्मिला बाबर, सुजाता पालांडे, आरती चौंधे, निर्मला कुटे, तेजस्विनी कदम, शैला मोळक, आशा काळे, भारती विनोदे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लॉकडाउन काळात नागरिकांना वीज बीले भरमसाठ वाढवून दिली आहेत. लॉकडाउनमुळे नागरिकांना रोजगार नव्हता. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सरकारने अगोदर वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली. परंतु, त्यावरुन घूमजाव केला. आता महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठविली आहे. जनतेला अंधारात ठेवण्याचे पाप सरकार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, ”वीज बील माफी झालीच पाहिजे” अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.