Pimpri News: महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात भाजपची निदर्शने

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या आठवड्याभरात चार ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

महिला सुरक्षेबाबत सरकारला जाग कधी येणार? असा सवाल उपस्थित करीत पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज (सोमवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन निदर्शने करण्यात आली. युवा मोर्चाच्या पूजा आल्हाट, प्रियांका शाह, तेजस्विनी कदम, प्रियांका देशमुख, आरती ओव्हाळ यांच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले. या वेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस दिनेश यादव, गणेश जवळकर, प्रदेश सदस्य अजित कुलथे, शिवराज लांडगे, प्रसाद कस्पटे,

शिरीष जेधे, प्रकाश चौधरी, जयदीप करपे, आदित्य कुलकर्णी, अमित देशमुख, अमित गुप्ता, मंगेश धाडगे, प्रशांत बाराथे, पंकज शर्मा, सागर घोरपडे, सन्नी बारणे, राजेश डोंगरे, गिरीष देशमुख, युवती संयोजिका सोनम गोसावी, रवीशेठ जांभुळकर, सोनम जांभुळकर, अर्पिता कुलकर्णी, शुभांगी कसबे, ज्योती खांडरे, सारिका माळी आदी उपस्थित होते.

राज्यात आठवडाभरात पुणे, मुंबई, अमरावती सारख्या शहरात लहान मुली, महिलांवर अमानवीय प्रकारे बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तसेच साकीनाका घटनेतील तरुणीवर तर अत्यंत घृणास्पद अत्याचार करून मारण्यात आले. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विकृत नराधमाला फाशीची कठोर शिक्षा देऊन पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा.

तसेच काही दिवसांपासून महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढत होत आहे. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आघाडी सरकारने कडक पावले उचलून लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या पुजा आल्हाट यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.