Pimpri News : सरकारीकरण केलेली देशभरातील मंदिरे भाजपने मुक्त करावीत – हिंदु जनजागृती समिती

एमपीसी न्यूज – चिक्कमंगळुरु, कर्नाटक भाजपचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांनी ‘तामिळनाडू राज्यात भाजपची सत्ता आल्यास सर्व मंदिरे भक्तांना परत करणार’ असल्याचे वचन दिले आहे.

मंदिरे मुक्त करा, या अभियानाला त्यांनी समर्थन दिले आहे. मात्र, भाजपने सरकारीकरण केलेली देशभरातील सर्व मंदिरे मुक्त करावीत अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आल्यास राज्यातील सर्व मंदिरे पुन्हा भक्तांच्या स्वाधीन करण्यात येतील, असे आश्‍वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी दिले होते. तसा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. कर्नाटकात भाजपची सत्ता आल्यावर सर्वप्रथम गोरक्षणाचा कायदा संमत केला, त्याच प्रकारे आता कर्नाटकातील सर्व मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्याचा निर्णय घ्यावा.

भाजपशासित अन्य राज्यांतही मंदिर सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.