Pimpri news: महापालिका सभागृहात भाजपकडून विरोधकांच्या हक्कावर गदा – राजू मिसाळ

मानदंडासमोरील अडथळा हटवा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातील पीठासन अधिका-यांच्या आसनापुढील मानदंडा समोर सत्ताधारी भाजपने फर्निचर वाढवून अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे आम्हाला मानदंडापर्यंत जाता येत नाही. सभा कामकाजामध्ये विरोधकांना प्रखर विरोधाच्या वेळी आपले म्हणणे ठामपणे मांडून मागण्या मान्य करुन घेण्याकरिता विरोध करण्यासाठी मानदंडापर्यंत जाण्याची प्रथा आहे. अडथळा निर्माण करून भाजपकडून विरोधकांच्या हक्कावर गदा आणल्याचा आरोप करत तो तत्काळ हटविण्याची मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.

याबाबत मिसाळ यांनी महापौर उषा ढोरे यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात महापालिका सभा होत असतात. या सभेचे पीठासन अधिकारी (महापौर) यांच्या आसनासमोर प्रथेप्रमाणे मानदंड ठेवला जातो.

सभा कामकाजामध्ये विरोधकांना प्रखर विरोधाच्या वेळी आपले म्हणणे ठामपणे मांडून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी विरोध करण्यासाठी मानदंडापर्यंत जाण्याची प्रथा आहे. लोकशाही परंपरेत हा विरोधकांचा हक्क आहे. त्याच प्रमाणे सभेमध्ये स्फोटक वातावरण निर्माण झाल्या मानदंड उचलला गेल्यास वातावरण शांत होते.

परंतु, काही दिवसापासून सभागृहामध्ये पीठासन अधिका-यांच्या आसनासमोर मानदंडासमोर सत्ताधारी पक्षाने जाणून बजून अडथळा निर्माण केला आहे. फर्निचर वाढविले आहे. त्यामुळे आम्हाला मानदंडापर्यंत जाता येत नाही. वस्तुत: सन 2012 पासून हे नविन सभागृह अस्तित्वात आले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना विरोधकांना कायम आदराची वागणूक दिलेली आहे.

मानदंडासमोर अडथळा निर्माण करण्याची हि कल्पना कोणाच्या सुपिक डोक्यातून आलेली आहे. महापौर तुम्ही सुध्दा पूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये होता. त्यावेळी आपण विरोधकांना अशी वागणूक दिली आहे का? आणि आता तुम्ही विरोधकांना अशी वागणूक देत आहात. हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला प्रथेचा भंग करणारे आहे. तसेच विरोधकांच्या हक्कावर गदा आणली जात आहे.

यशवंतराव चव्हाण सभागृहातील पीठासन अधिका-यांच्या आसना पुढील मानदंडाच्या समोरील अडथळा त्वरीत काढून टाकण्यात यावा; अन्यथा आपल्या कार्यालयासमोर धरणे आदोलंन करु, असा इशारा मिसाळ यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.