Pimpri News : भाजप युवा मोर्चाच्या वतीने 150 महिलांना ‘सॅनिटरी नॅपकीन’चे वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय जनता युवा मोर्चा आणि  सोशल मीडिया सेल  यांच्या वतीने शहरातील 150 गरजु महिलांना ‘सॅनिटरी नॅपकीन’चे वाटप करण्यात आले. मकर संक्रातीच्या औचित्याने गुरूवारी ( दि. 14) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

_MPC_DIR_MPU_II

भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे व सोशल मीडिया सह संयोजिका प्रियांका सिंग यांच्या पुढाकारने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगरसेविका आरती चोंधे व नगरसेविका निर्मला कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. आर्थिक दुष्ट्या कमकुवत असलेल्या 150 महिलांना यावेळी सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोशल मीडिया सह संयोजिका मानसी रत्नपारखी, सामाजिक कार्यकर्ते शिरीष पटेल, जिल्हा उपाध्यक्ष संकेत कुटे, सोशल मीडिया संयोजक विक्रांत गंगावणे, क्रीडा आघाडी सह संयोजक प्रथमेश सकपाळ, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष सन्नी बारणे, सोशल मीडिया सदस्य अमित सुतार यांनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.