Pimpri News: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चुकीच्या पध्दतीने अटक केल्याच्या आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर भाजपने अटकेच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

मोरवाडीतील पक्ष कार्यालयासमोर शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आंदोलन झाले. महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सभागृह नेते नामदेव ढाके, पीसीएनटीडीएचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर नितीन काळजे, क्रीडा समितीचे सभापती प्रा. उत्तम केंदळे, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस, नगरसेवक बाबू नायर, विजय फुगे, राजू दुर्गे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप आमदार महेश लांडगे यांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.