Pimpri News: भाजपचे मिशन 100 प्लसचा नारा, कार्यकर्त्यांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटी-गाठी!

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये शहर भाजपने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. भाजपने ‘मिशन 100+’ हाती घेतले आहे. त्यासाठी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तयारीचा ‘शड्डू ठोकला’ आहे.

शहर भाजपातर्फे शनिवारपासून (दि.17) पक्षाच्या ‘बुथ सक्षमीकरण’ अभियानाला सुरुवात करण्यात आली. मोहननगर येथील प्रभाग क्रमांक 14 पासून आमदार लांडगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी जुने-जाणते कार्यकर्ते तसेच बूथ प्रमुखांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटीगाठी घेऊन चर्चा केली. शहर भाजपचा हा ‘बूथ सक्षमीकरण’ पॅटर्न कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जुन्या कार्यकर्त्या डॉ. प्रतिभा लोखंडे व अनिल लोखंडे यांच्या घरापासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप प्रदेश महिला अध्यक्ष उमा खापरे, सरचिटणीस नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस, नगरसेवक बाबू नायर, भाजप जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा उज्ज्वला गावडे, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी, समीर लोखंडे, नंदू भोगले, तेजस्विनी दुर्गे, कमलेश लुंकड, अजिंक्य गोळे, नागेश वाघमोडे, सदाशिव गोरड, बबनराव देवकाते, चैतन्य देशपांडे, प्रकाश हगवणे, विठ्ठल कराळे, विक्रम वाहिले, योगेश देशपांडे, रमेश येवले, लखन पाटकर, देव दुर्गे, प्रथमेश दंगाणे, गणेश बंब आदी उपस्थित होते. भाजपा जिल्हा सरचिटणीस राजु दुर्गे, गणेश लंगोट आणि कैलास कुटे यांनी या अभियानाचे नियोजन केले.

शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे बुथप्रमुख, जुने जाणते कार्यकर्ते, इतर पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी थेट चर्चा करत पक्षवाढ, संघटन, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करावी लागणारी कामे याबात सूचना आणि मार्गदर्शन केले. तसेच आमदार लांडगे यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या समजावून घेत त्या सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. हा उपक्रम असाच सुरु राहणार असून आमदार लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरभरात राबविण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे यांच्याबाबत पदाधिकारी आणि ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आकर्षण आहे. अभियानाच्या पार्श्वभूमीवर थेट आमदार घरी येऊन चर्चा करत असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. तसेच अनेकांनी आमदार लांडगे घरी आल्याचे तसेच चर्चा करत असल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर केले. आमदार लांडगे यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप देऊन जोमाने कामाला सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून याचा पक्षवाढीला फायदा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.