Pimpri News : बिहारमध्ये भाजपची मुसंडी; शहर भाजपचा जल्लोष

एमपीसी न्यूज – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजप पुढे येत आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपने जल्लोष केला.

महापौर उषा ढोरे यांनी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, सरचिटणीस विजय फुगे, शहर उपाध्यक्ष नंदकुमार दाभाडे, भाजयुमोचे उपाध्यक्ष जवाहर ढोरे, अंकुश लोंढे, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, संजय परळीकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखिल बिहार विजयाचा आनंद साजरा केला.

_MPC_DIR_MPU_II

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरु असून पहिल्या क्रमांचा पक्ष होण्याकरिता भाजप आणि आरजेडीमध्ये काटे की टक्कर सुरु आहे. भाजप पहिल्या क्रमांकाच पक्षा म्हणून पुढे येत आहे. भाजप-जेडीयू युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजप क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. पुन्हा एकदा विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जनतेने भाजपाच्या पारड्यात आपला कौल दिला आहे, असे भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यावेळी बोलताना म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.