Pimpri News : शिव महिंद्राच्या शिबिरात 25 दात्यांचे रक्तदान, 37 जणांची आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज – महिंद्रा अँड महिंद्राचे अधिकृत डिलर शिव महिंद्रा यांच्या वतीने आयोजित शिबिरात 25 जणांनी रक्तदान केले तर 37 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आज (सोमवार, दि.15) रामनगर, चिंचवड येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता शिव महिंद्रा यांच्या वतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महिंद्रा कंपनीचे विभागीय ग्राहक सेवा व्यवस्थापक अजय राय यांनी केले.

यावेळी शिव महिंद्रा मधील 25 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले तसेच 37 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पिंपरी सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूटने या शिबिरासाठी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.