Pimpri News : पिंपरी कॅम्प येथील ‘रिपाइं’च्या शिबिरात 35 जणांचे रक्तदान

एमपीसीन्यूज : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त सुभेदार रामजी आंबेडकर नगर, पिंपरी कॅम्प येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात एकूण 35 जणांनी रक्तदान केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  (आठवले गट) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे व प्रभाग अध्यक्ष मनोज जगताप यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे, ‘रिपाइं’चे बाळासाहेब भागवत, खाजाभाई शेख, कुणाल वाव्हळकर, हरेश देखणे, विनोद चांदमारे, शेखलाल नदाफ, सुजित वाघमारे, हरी नायर, सत्याप्रकाश शेगर, कृष्णा भोसले, लखन कांबळे, यशवंत सूर्यवंशी, शुभम शिंदे, जमीर शेख, शौकत शेख, प्रदीप जाधव, प्रशांत वाघमैतर, सुशील कर्डक, केतन सोनावणे, विलास गरड आदी उपस्तिथ होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.