Pimpri news: मोरवाडीत 40 जणांचे रक्तदान, 80 नागरिकांची दंत तपासणी

एमपीसी न्यूज – कै.नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात 40 जणांनी रक्तदान केले. 25 नागरिकांची नेत्र तपासणी, 80 नागरिकांची दंत तपासणी करण्यात आली.

मोरवाडी, म्हाडा येथील एसएनबीपी स्कूल येथे झालेल्या या रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नगरसेविका आशा शेंडगे -धायगुडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी उद्योजक विजयराज पिसे, डाॅ. दिनेश गाडेकर, बीआरटी विभागाचे उपअभियंता विजय भोजने, डाॅ. संजीव शभूस, संतोष पांढरे, गजानन म्हैसने पाटील, सुनिल बनसोडे , जीवन पिसे , समाजिक कार्यकर्त्या रोहिणी रासकर, हिराकांत गाडेकर, गणेश एकल उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेणुका भोजने, कांचन भोजने, प्रथमेश भोजने , निरज भोजने, अर्थव भोजने, रजनीकांत गायकवाड, यश गजबरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आयोजन दीपक भोजने मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.