-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 21 जिजामाता हॉस्पिटलची सीमाभिंत बांधणे व उर्वरित स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणाऱ्या 67 लाख 37 हजारांसह शहरातील विविध विकास कामांच्या येणाऱ्या आणि झालेल्या सुमारे 71 कोटी 65 लाख रुपये खर्चास आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 6 मधील धावडे वस्ती व परिसरात स्थापत्य विषयक सुधारणेची कामे करण्याकामी 59 लाख 72 हजार, दिघी बोपखेल मधील रामनगर येथे ठिकठिकाणी ट्रिमिक्स कॉक्रीट करण्याकामी 56 लाख 57 हजार, प्रभाग क्रमांक 17 परिसरामध्ये विविध कंपन्या आणि मनपा मार्फत खोदण्यात आलेले चर डांबरीकरणाने दुरुस्त करण्यासाठी 53 लाख 65 हजार, ब प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्याकामी 59 लाख 45 हजार, चिंचवड येथे मोरया गोसावी मंदिर शेजारी दशक्रिया घाट परिसराची स्थापत्य विषयक कामे करण्याकामी 61 लाख 59 हजार इतक्या येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 32 मध्ये विविध परिसरात सुशोभिकरण व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 27 लाख 10 हजार, कुदळवाडी जाधववाडी मध्ये ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविण्याकामी 35 लाख 69 हजार, पवना नदीतील टाटा ब्रीज ते बोपखेल या क्षेञात असलेली जलपर्णी काढण्याकामी 25 लाख 20 हजार, अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जंबो कोविड रुग्णालय उभारणीसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी तीन महीने कालावधीसाठी 5 कोटी 66 लाख 40 हजार एवढा खर्च येणार आहे. त्यातील 3 कोटी 77 लाख 60 हजार इतक्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिलेली होती. उर्वरीत 1 कोटी 88 लाख 80 हजारच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे बीआरटीएस कॉरिडॉरवरील शिंदे वस्ती येथे उड्डाणपुल बांधणेचे कामात अडथळा ठरणारा EHV,220 KV पयलोन शिफ्ट करणे या कामाचे सुपरविजन चार्जेस 1 कोटी 21 लाख 87 हजार, सोनवणे वस्ती रामदासनगर परिसरातील जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी 39 लाख 50 हजार, पवारवस्ती नेवाळेवस्ती मध्ये नाला ट्रेनिंग व स्टाँर्म वाँटर विषयक कामे करण्यासाठी 58 लाख 4 हजार, चिखली मधील विविध डी.पी, रस्ते विकसीत करण्यासाठी 1 कोटी 47 लाख 3 हजार इतक्या येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

कामगारनगर, खराळवाडी, भगवतगीता मंदीर परिसरा नुरमोहल्ला, कुलदीप आंगन परिसर मधील अंतर्गत रस्ते अद्यावत पध्दतीने करण्यासाठी 42 लाख 25 हजार, प्रभाग क्रमांक 11 मधील उर्वरीत रस्त्याचे हाँटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी 1 कोटी 11 लाख 23 हजार इतक्या येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 1 मोरेवस्ती म्हेत्रेवस्ती परिसर रामदासनगर मधील रस्ते खडीमुरूम व डांबरीकरण करण्याकामी 1 कोटी 51 लाख 17 हजार इतक्या येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नव्याने विकसित होणाऱ्या मुख्य चौकात नवीन वाहतूक नियंत्रण दिवे, ब्लिंकर बसविण्यासाठी 25 लाख 59 हजार, भोसरी येथील सिताराम लोंढे उद्यानातील महापालिकेची भवानी तालीम व्यायामशाळेचे नुतनीकरण करण्याकामी आणि अनुषंगिक कामे करण्याकामी येणाऱ्या 3 कोटी 39 लाख 13 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. दिघी व बोपखेल परिक्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे परिचलन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी 48 लाख, भोसरी पंपीग स्टेशन भोसरी गावठाण टाकी शांतीनगर आश्रमशाळा आणि संत तुकाराम नगर येथील जलक्षेत्रामध्ये दैनंदिन व्हॉल्व ऑपरेशन करण्याकामी 48 लाख इतक्या येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.