Pimpri News: शहरवासीयांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प : नामदेव ढाके

 एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सन 2021-22  साठी सादर केलेला अर्थसंकल्प शहरातील सर्वसामान्यांच्या अपेक्षाभंग करणारा आहे. या अर्थसंकल्पातून  महाराष्ट्राला नाही तर मुंबई महापालिकेला भरघोस निधी दिला गेला आहे.

इतर महापालिकांना दुय्यम स्थान देण्यात आल्याचे दिसून येते. कोरोना काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेने जवळपास 300 कोटी रुपयांचा निधी खर्ची केला. परंतू,  शासनाकडून कमीत कमी 150  कोटी रकमेचा निधी मिळणे अपेक्षित असताना राज्य शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली  नाही.

अर्थसंकल्पातही त्याबाबत कुठलीही तरतूद नाही. शहरवासीयांना वीज बीलात कुठलीही सुट दिली नसल्याने निव्वळ चेष्टा झाल्याचे अर्थसंकल्पातून  दिसून येते.  केंद्रशासनाकडून रस्ते, महामार्ग, सिंचन आणि पाणीपुरवठा असे महत्वाचे प्रकल्प सुरु असून ते या राज्य शासनाने आपल्या नावे खपविल्याचा प्रकार अर्थसंकल्पातून दिसून येतो, असेही ढाके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.