Pimpri News : मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – उत्पन्नावरील कर सवलतीची मर्यादा (Pimpri News) वाढवून देशातील कोट्यवधी कुटुंबाना आर्थिक स्थैर्याची ग्वाही दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग सुनिश्चित केला आहे, अशा शब्दांत भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

नवीन कर प्रणाली अंतर्गत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाती पैसा शिल्लक राहून त्याची क्रयशक्ती वाढेल व विकासास चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साखर कारखान्यांनी 2016-17 पूर्वी शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी दिलेले पैसे खर्च समजण्याची तरतूद करून साखर कारखान्यांच्या आयकराच्या प्रश्नावर कायमचा तोडगा काढला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Pune Crime : पुण्यातील 250 हून अधिक लोकांची नासा, इस्रोच्या नावाखाली 5 ते 6 कोटींची फसवणूक

गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आणखी एक वर्ष सुरू ठेवण्याचे जाहीर करून मोदी सरकारने पालकत्वाच्या जबाबदारीचे भान जपले. नवीन विमानतळ आणि हेलिपॅडही बांधले जातील. तरुणांसाठी 30 आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वेच्या खर्चासाठी 2.40 लाख कोटी रुपये, सूक्ष्म , लघु आणि माध्यम उद्योगांना ( एमएसएमई ) ना 9 हजार कोटींची पतहमी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी 35 हजार कोटी रुपयांची हमी यांमुळे विकासाच्या गतीला चालना मिळणार असून खऱ्या अर्थाने अमृतकाळाचा आशादायक आरंभ झाला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.