Pimpri News : खोटी स्वप्ने दाखविणारा अर्थसंकल्प –  काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज- राज्यातील जनतेची घोर निराशा करणारा (Pimpri News) खोटी स्वप्ने दाखवणारा 16 लाख कोटी महसूल तुटीचा  अर्थसंकल्प असल्याची टीका कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष  काशिनाथ नखाते यांनी केली.

महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणातून स्थिती बिघडलेली आहे. विकासदर महाविकास आघाडी असताना 9.1% होता. त्यात 2.3 घट होऊन 6.8 टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अहवाल आहे. यास अनुसरून अर्थसंकल्पामधून मोठ्या अपेक्षा होत्या. महाराष्ट्र राज्यातील कामगारांसाठी ठोस काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती.

मात्र त्यांची निराशा झाली आहे. राज्यातील उद्योगांसाठी 934 कोटीची घोषणा अत्यंत अल्प आहे. रोजगार निर्मितीसाठी 11658  कोटी रुपयांचा निधी हा यापूर्वी प्रमाणे हे प्रत्यक्षात विनियोग होईल असे दिसत नाही.

Chichwad News : 2024 ला चिंचवडचा आमदार राष्ट्रवादीचाच असणार; कार्यकर्त्यांचा निर्धार

कोरोना नंतर उद्योग व  व्यवसाय वाढीसाठी व रोजगार वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे होते. मात्र तसे प्रत्यक्ष दिसत नाही. नवीन महामंडळाबाबत काही घोषणा करण्यात आल्या. मात्र यापूर्वीही अशा घोषणा झाल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात निधी न दिल्याने पुढे कुठलेही कामकाज झालेले नाही. यापूर्वीचे अर्थमंत्री अजित (Pimpri News) पवार यांनी वढू बुद्रुक येथील स्मारकासाठी यापूर्वीच निधी जाहीर केलेला आहे.

 

त्यालाच नवीन मुलामा लावण्यात आलेला आहे. 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी  ठरलेली असून जे 8 वर्षात झाले नाही  घरे मिळालीच नाहीत ते एका वर्षात दहा लाख घरांचा महत्वकांक्षी प्रकल्प हा केवळ दिवा स्वप्नच ठरणार असल्याची टीका नखाते यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.