Pimpri News: ‘बीव्हीजी’ आता महापालिकेला रोपे पुरविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्वच्छतेची, घरोघरचा कचरा संकलाचे काम करणारे भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड इंडिया (बीव्हीजी) कंपनी आता महापालिकेला रोपे पुरविणार आहे. त्यांच्याकडून 45 लाख 59 हजार रुपयांची मोठी रोपे खरेदी करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सन 2021-22 या वर्षासाठी वृक्षारोपनाकरिता मोठी रोपे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने 47 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यात बीव्हीजी इंडिया, निसर्ग लॅन्डस्केप प्रा.लि आणि न्यु गार्डन गुरुज फार्म अ‍ॅण्ड नर्सरी या तीन पुरवठादारांनी सहभाग घेतला होता.

त्यापैकी बीव्हीजी इंडिया यांनी – 3 टक्के कमी दराची निविदा होती. त्यासाठी सहा महिने कालावधीसाठी येणारा खर्च 45 लाख 59 हजार रुपये प्रमाणे त्यांची निविदा स्वीकृत केली. त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.