Pimpri News : तीन सदस्यीय प्रभाग रचनेसाठी मंत्रिमंडळाची मान्यता

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने तीन सदस्यीय प्रभाग रचनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत.

प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडी सरकार मधील पक्षांमध्ये विविध मत मतांतरे होती. वेगवेगळ्या प्रभाग रचनेवर मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. बुधवारी (दि. 22) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबई महापालिका निवडणूक एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. मात्र याबाबत अद्याप आदेश जारी झालेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.