Pimpri News: कोरोना बेडसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे बेडची मागणी वाढली आहे. नागरिकांना बेड मिळविण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे.

कोरोना बेडसाठी 020-67331151, 020-67331152 या हेल्पलाईन आणि सारथीच्या 8888006666 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून दोन हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने बेडची कमतरता भासत आहे. नागरिकांची तारांबळ होत आहे. बेड मिळत नाहीत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. वायसीएम रुग्णालय, पिंपरीतील नवीन जिजामाता, भोसरीतील नवीन रुग्णालय, बालनगरी, ऑटो क्लस्टर, घरकुल येथील कोविड केअर सेंटर हाऊस फुल झाले आहेत. रुग्णसंख्या वाढू लागल्याने जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जम्बो सेंटरमध्ये 400 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांना बेड मिळविण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. कोरोना बेडसाठी 020-67331151, 020-67331152 या हेल्पलाईन आणि सारथीच्या 8888006666 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.