Pimpri News: पिंपरी कॅम्पातील पार्किंग बाबत तोडगा काढू : आमदार आण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापा-यांच्या अनेक समस्या आहेत. पिंपरी कॅम्पमधील व्यापा-यांचा पी – 1 आणि पी – 2 अशा पार्किंग पध्दतीस विरोध आहे. हा विरोध रास्त आहे. त्यासाठी आपण सर्व व्यापा-यांची बैठक पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याबरोबर लवकरच घेऊन या विषयावर मार्ग काढू, अशी ग्वाही आमदार आण्णा बनसोडे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड शहरातील सतरा व्यापारी संघटनांची पिंपरी कँम्पमध्ये रविवारी बैठक घेण्यात आली. नगरसेवक डब्बू आसवाणी, शितल शिंदे, निकीता कदम आणि बहुतांशी व्यापारी बंधू उपस्थित होते. यावेळी उद्योजक श्रीचंद आसवाणी यांची पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनच्या अध्यक्षपदावर सर्वानुमते निवड करण्यात आल्याबद्दल आमदार बनसोडे यांनी आसवाणी यांचे अभिनंदन केले.

डब्बू आसवाणी, शितल शिंदे, धनराज आसवाणी यांनी देखिल व्यापा-यांच्या समस्या बैठकीत मांडल्या. आण्णा बनसोडे यांनी पदपथावरील अतिक्रमणे काढण्याबाबत व्यापा-यांना आवाहन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.