Pimpri News: ‘जॅकवेल’ची निविदा रद्द करा; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. पण, भामा आसखेड धरणाजवळ मौजे वाकी तर्फे वाडा येथे जलउपसा केंद्र बांधण्याबाबतच्या कामासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत भष्टाचार होत असेल. तर, ही निविदा रद्द करावी. नव्याने फेरनिविदा काढण्याची मागणी मनसेने केली आहे.

PCMC News: ‘जॅकवेल’च्या निविदा प्रक्रियेची चौकशी करा; भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे आयुक्तांना पत्र

याबाबत मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना निवेदन दिले आहे. उप शहराध्यक्ष बाळा दानवले, राजु सावळे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या कामाची मूळ निविदा 121 कोटी रुपयांची असताना 151 कोटी रुपयांची निविदा सादर करण्यात आलेली आहे. यासंदर्भात संबधित ठेकेदाराला काम देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे.

या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचे दिसते. त्याबाबत सातत्याने आरोप होत आहेत. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सविस्तर माहिती द्यावी. ही निविदा रद्द करण्यात यावी. नव्याने निविदा काढावी अशी मागणी चिखले यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.