Pimpri News : कोरोना संकटातील डायऱ्या खरेदीचा विषय रद्द करा : राहुल कोल्हटकर

पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समितीचा अजब कारभार

0

एमपीसीन्यूज : कोरोना संकटामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट निर्माण झाली आहे.  याच काळात   महानगरपालिकेचा  शिक्षण विभाग मात्र ठेकेदार पोसण्याकरीता गरीब विद्यार्थ्यांच्या नावावर अनावश्यक शालेय साहित्य खरेदीकरीता कोट्यावधी रूपये खर्च करण्यात व्यस्त आहे.   विद्यार्थ्यांच्या नावावर शिक्षण समिती सदस्य व ठेकेदार यांचा खिसा गरम करण्याचे काम शिक्षण विभाग करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केला आहे. तसेच हा विषय रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

यासंदर्भात कोल्हटकर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड महापालिकेच्या 109 प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 42000 विद्यार्थी शिक्षण घेतात. सध्या कोव्हीड 19 ( कोरोना व्हायरस) विषाणूजन्य परिस्थिती आहे . राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यार्थी यांना शाळेत येण्यास मनाई आहे. जो पर्यंत राज्य शासनाचा शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आदेश निघत नाही तोपर्यंत मनपा शाळा बंदच राहणार आहे.  कोरोना व्हायरसचा प्रसार व पादुर्भाव पाहता शाळा सुरू होतील का ? याबाबत शंका उपस्थित होते आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या दि.4 मार्च 2021 रोजी झालेल्या बैठकीत पालिकेच्या सर्व प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना वापरासाठी दैनंदिनी ( डायरी) खरेदी करण्याचा ठराव करण्यात आला. हा ठराव उद्या बुधवारी (दि. 7) होणाऱ्या स्थायी समिती समोर विषय पत्रिकेवर घेण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये बहुतेक शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब परिस्थितीतून येत असतात. पालिकेच्या शाळेचा दर्जा खाजगी शाळेच्या प्रमाणे करण्याकरीता विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण होण्याकरिता तसेच मनपाच्या शाळेतील विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढ करण्याकरीता व आपल्या मनपा शाळेची पटसंख्या वाढवण्याकरीता शिक्षण समिती प्रयत्न करीत आहे.

त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना वापरासाठी दैनंदिनी ( डायरी) दिल्यास रोज करण्यात येणारा अभ्यास घरी दिलेला अभ्यास तसेच महत्वाच्या नोंदी त्यामध्ये करण्यात येवुन रोज त्या दैनंदिनी पालकही पाहतील व विद्यार्थी यांची रोजची माहिती प्राप्त होईल याकामी विद्यार्थ्यांना दैनंदिनी ( डायरी ) खरेदीकामी  घेण्यात येणा-या खर्चास मान्यता देण्याबाबत विचार करणे असा विषय आहे.

हा विषय शाळा बंद असुनसुद्धा ठेकेदार पोसण्याच्या कामासाठी ठेवण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती पाहता तो गरजेचा नसल्याने स्थायी समिती व आयुक्त यांनी हा विषय रद्द करावा अथवा दप्तरी दाखल करावा, अशी   मागणी राहुल कोल्हटकर यांच्यावतीने करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment